आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषलोकशाहीतील घराणेशाही!:महाराष्ट्रावर मोजक्याच घराण्यांचे राज्य, विधानसभेला 81% उमेदवार घराणेशाहीतील

अनिल जमधडे | औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, यानिमित्त लोकशाहीचे विदारक वास्तव समोर आले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देश तसेच राज्यात काही मोजक्याच घराण्यांचे राज्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकशाहीच्या नावाखाली आता आधुनिक संस्थानेच निर्माण होत आहेत. लोकशाहीने प्रत्येकाला समान संधीचा अधिकार दिला असताना घराणेशाहीमुळे बहुसंख्यांकांकडून नेतृत्वाची संधीच हिरावून घेतली जात आहे. याचा मोठा फटका राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी काही करु इच्छिणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसह बहुजनांनाही बसत आहे. त्यांच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक विकासात घराणेशाही मोठा अडथळा ठरत आहे.

सर्वच मतदारसंघात घराणेशाही

महाराष्ट्रावर फक्त 48 घराणी राज्य करतात, असे पूर्वी म्हटले जात होते. त्यातही मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात घराणेशाहीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 20 मतदारसंघात घराणेशाही पार्श्वभूमी असलेले तब्बल 19 उमेदवार होते. म्हणजे जवळपास सर्वच मतदारसंघात घराणेशाहीचा दबदबा होता. याशिवाय 2019च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांतील 116 मतदारसंघात घराणेशाही पार्श्वभूमी असलेले 94 उमेदवार होते. म्हणजेच एकूण उमेदवारांपैकी तब्बल 81.03 टक्के उमेदवार हे घराणेशाहीतून समोर आले होते. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात घराणेशाहीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या दोन विभागांचा अभ्यास केल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

वास्तव अधिक भीषण

विशेष म्हणजे या उमेदवारांच्या कुटुंबामध्ये पूर्वी कुणी आमदार किंवा खासदार होते की नाही, ऐवढाच निकष घराणेशाहीसाठी वापरला आहे. तरीदेखील लोकसभा व विधानसभेतील उमेदवारांमध्ये घराणेशाहीचे प्रमाण प्रचंड आढळले आहे. निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांची सहकारी, खासगी कारखाने तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीतील कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली असती तर घराणेशाहीतून समोर आलेल्या उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली असती.

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या 14 जिल्ह्यांमधील विधानसभा मतदारसंघात घराणेशाही नेमकी कशी आहे, हे सविस्तर पाहुयात...

राष्ट्रवादीत सर्वाधिक घराणेशाही, भाजपही पुढे

वरील आकडेवारीवरुन लक्षात येते की, गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील 116 मतदारसंघांत घराणेशाही पार्श्वभूमी असलेले एकूण 94 उमेदवार होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 35 उमेदवार होते. विशेष म्हणजे त्याखालोखाल भाजपने तब्बल 25 उमेदवार हे घराणेशाहीतून दिले होते. त्यानंतर घराणेशाही पार्श्वभूमी असलेले काँग्रेसचे 19 तर, शिवसेनेचे 11 उमेदवार होते. म्हणजेच सर्वच राजकीय पक्षांत घराणेशाही हे आता प्रमुख वैशिष्ट्य आहे.

मतदारांसमोर दुसरा पर्यायच नाही

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात 116 मतदारसंघांत 94 उमेदवार घराणेशाहीचे आहेत, याचा अर्थ जवळपास प्रत्येक मतदारसंघावर घराणेशाहीचा प्रभाव आहे. कित्येक मतदारसंघात तर दोन्हीही प्रमुख उमेदवार हे घराणेशाहीचे आहेत. त्यामुळे जनतेला घराणेशाही निवडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. निवडून आलेल्या उमेदवारांच्या कुटुंबात मागची पिढी व ही पिढी अशा टर्म मोजल्या तर दीर्घकाळ सत्ता त्या कुटुंबात आहे. त्या मतदरासंघात विरोधी पक्ष नीट उभा राहू दिला जात नाही. त्यामुळे अशा मतदारसंघात लोकशाही नावालाच आहे. ही संस्थाने झाली आहेत.

42 टक्के उमेदवार पराभूत

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय घराणेशाहीतील 54 उमेदवार विजयी झाले. तर, 40 उमेदवार पराभूत झाले. म्हणजेच जवळपास 42 टक्के घराणेशाहीतील उमेदवार पराभूत झाले. याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, घराणेशाहीचे 94 पैकी 40 उमेदवार पराभूत झाले तरी घराणेशाही उलथून टाकावी, अशा प्रकारचा हा कौल नव्हता. या 40 उमेदवारांच्या पराभवाची कारणे वेगळी होती. या उमेदवारांनी ऐनवेळी केलेले पक्षांतर लोकांना आवडले नाही. याशिवाय भाजपविरोधी नाराजी, सांगली-कोल्हापुरात पुराच्या काळात सरकारने प्रभावी उपाययोजना न करणे, अशी काही कारणे आहेत. त्यामुळे हे उमेदवार पराभूत झालेत. घराणेशाहीचा उमेदवार हरावा, असे मुद्दे प्रचारात येत नाहीत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील घराणेशाहीचे उमेदवार...

1) जिल्हा - कोल्हापूर

मतदारसंघपक्षपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
चंदगडसंग्राम कुपेकरशिवसेनाकाका व काकू आमदार
कोल्हापूर
दक्षिण
अमल महाडिकभाजपवडील 3 टर्म आमदार, चुलत भाऊ 2 टर्म खासदार
ऋतुराज पाटीलकाँग्रेसआजोबा 1 टर्म आमदार व राज्यपाल काका 2 टर्म मंत्री व आमदार
हातकणंगलेराजूबाबा आवळेकाँग्रेसवडील एकदा खासदार व 5 टर्म आमदार
इचलकरंजीराहुल खंजिरेकाँग्रेसआजोबा 2 टर्म आमदार, आजी एकवेळा खासदार
प्रकाश आवाडेअपक्षवडील मंत्री
शाहुवाडीसत्यजित पाटीलशिवसेनावडील बाबासाहेब पाटील आमदार
विनय कोरेजनसुराज्यतात्यासाहे कोरे आमदार

2) सांगली

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
सांगलीपृथ्वीराज पाटीलकाँग्रेसवडील गुलाबराव पाटील राज्यसभा खासदार
इस्लामपूरगौरव नायकवाडीशिवसेनाआजोबा आमदार नागनाथ अण्णा नाईकवाडी
जयंत पाटीलराष्ट्रवादीराजाराम पाटील माजी मंत्री
शिराळामानसिंगराव नाईकराष्ट्रवादीचुलते आमदार आनंदराव नाईक
पलूस कडेगावविश्वजित कदमकाँग्रेसवडील पतंगराव कदम 7 वेळा आमदार
तासगावसुमनताई पाटीलराष्ट्रवादीपती आर. आर. पाटील 6 वेळा आमदार

3) सातारा

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
वाईमदन भोसलेभाजपवडील प्रतापराव भोसले 4 टर्म आमदार, 3 टर्म खासदार
मकरंद पाटीलराष्ट्रवादीवडील लक्ष्मणराव पाटील 10 वर्षे खासदार
कराड उत्तरबाळासाहेब पाटीलराष्ट्रवादीपी. डी. पाटील 5 टर्म आमदार
कराड दक्षिणअतुल भोसलेभाजपयशवंतराव मोहिते हे आजोबा
पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेसआनंदराव चव्हाण 2 टर्म व प्रेमलाकाकू 3 टर्म खासदार
पाटणशंभूराज देसाईशिवसेनाआजोबा बाळासाहेब देसाई 6 टर्म मंत्री
सत्यजित पाटणकरराष्ट्रवादीवडील विक्रमसिंह पाटणकर 4 टर्म मंत्री
साताराशिवेंद्रराजे भोसलेभाजपवडील अभयसिंहराजे भोसले 3 टर्म मंत्री

4) जिल्हा - पुणे

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
जुन्नरअतुल बेनकेराष्ट्रवादीवडील वल्लभशेट बेनके 4 टर्म आमदार
आंबेगावदिलीप वळसे पाटीलराष्ट्रवादीवडील दत्तात्रय वळसे आमदार
शिरूरअशोक पवारराष्ट्रवादीवडील रावसाहेब पवार आमदार
दौंडराहुल कुलभाजपवडील सुभाष कुल व आई आमदार
इंदापूरहर्षवर्धन पाटीलभाजपकाका शंकरराव पाटील 2 टर्म खासदार व आमदार 5 टर्म
बारामतीअजित पवारराष्ट्रवादीकाका केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री
पुरंदरसंजय जगतापकाँग्रेसवडील चंदुकाका जगताप आमदार
भोरसंग्राम थोपटेकाँग्रेसवडील अनंतराव थोपटे आमदार व मंत्री
शिवाजीनगरसिद्धार्थ शितोळेभाजपवडील अनिल शिरोळे खासदार
कसबामुक्ता टिळकभाजपविधान परिषद अध्यक्ष जयवंतराव टिळक यांच्या कुटुंबातील
चेतन तुपेराष्ट्रवादीवडील विठ्ठल तुपे आमदार व खासदार
पुणे छावणी परिसरसुनील कांबळेभाजपभाऊ दिलीप कांबळे मंत्री

5) जिल्हा - अहमदनगर

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
अकोलेवैभव पिचडभाजपवडील मधुकरराव पिचड माजी मंत्री
संगमनेरबाळासाहेब थोरातकाँग्रेसवडील भाऊसाहेब थोरात आमदार
शिर्डीराधाकृष्ण विखेभाजपवडील बाळासाहेब विखे खासदार व केंद्रीय मंत्री
कोपरगावस्नेहलता कोल्हेभाजपसासरे शंकरराव कोल्हे मंत्री व आमदार
आशूतोष अशोकराव काळेराष्ट्रवादीवडील अशोकराव काळे (आमदार)
नेवासाशंकरराव गडाखराष्ट्रवादीवडील यशवंतराव गडाख खासदार व आमदार
शेवगाव पाथर्डीमोनिका राजळेभाजपसासरे अप्पासाहेब 2 वेळा व पती 1 वेळा आमदार
प्रताप ढाकणेराष्ट्रवादीवडील बबनराव ढाकणे 3 वेळा आमदार, खासदार व केंद्रीय मंत्री
राहुरीप्राजक्त तनपुरेवडील प्रसाद तनपुरे आमदार
नगरसंग्राम जगतापवडील अरुण जगताप आमदार
कर्जत जामखेडरोहित पवारआजोबा शरद पवार व काका अजित पवार

6) जिल्हा - औरंगाबाद

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहेत
औरंगाबाद पूर्वअतुल सावेभाजपवडील दोन वेळा खासदार होते
कन्नडहर्षवर्धन जाधवअपक्षवडील आमदार व रावसाहेब दानवे यांचे जावई
गंगापूरसंतोष मानेराष्ट्रवादीवडील आमदार होते
वैजापूरअभय चिकटगावकरराष्ट्रवादीकाका भाऊसाहेब चिकटगावकर व वडील कैलास चिकटगावकर दोघे आमदार होते

7) जिल्हा - सोलापूर

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
करमाळारश्मी बागलशिवसेनावडील दिगंबर बागल मंत्री व आई आमदार
संजय शिंदेअपक्ष (राष्ट्रवादी पुरस्कृत)वडील आमदार, भाऊ आमदार व जि. प. अध्यक्ष
माढाबबनराव शिंदेराष्ट्रवादीवडील आमदार
सोलापूर- मध्यदिलीप मानेशिवसेनावडील ब्रम्हदेव माने आमदार
प्रणिती शिंदेकाँग्रेसवडील सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री
सांगोलाअनिकेत देशमुखशेकापगणपतराव देशमुख यांचा नातू
दीपक साळुंकेराष्ट्रवादीवडील, काका आमदार

8) जिल्हा - बीड

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
गेवराईलक्ष्मण पवारभाजपवडील माधवराव पवार आमदार
विजयसिंग पंडितराष्ट्रवादीवडील शिवाजीराव पंडित आमदार व मंत्री
माजलगावरमेश आडसकरभाजपवडील बाबुराव आडसकर आमदार
प्रकाश सोळंकेराष्ट्रवादीवडील सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री
बीडजयदत्त क्षीरसागरशिवसेनाआई केशरकाकू क्षीरसागर खासदार
संदीप क्षीरसागरराष्ट्रवादीआजी केशरकाकू क्षीरसागर खासदार
आष्टीबाळासाहेब आजबेराष्ट्रवादीकाका चंद्रकांत आजबे आमदार
केजनमिता मुंदडाभाजपसासू विमलताई मुंदडा मंत्री व आमदार
परळीपंकजा मुंढेभाजपवडील गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री
धनंजय मुंढेराष्ट्रवादीकाक गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री

9) जिल्हा - जालना

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
घनसांगवीराजेश टोपेराष्ट्रवादीवडील खासदार
भोकरदनसंतोष दानवेभाजपवडील सध्या मंत्री
चंद्रकांत दानवेराष्ट्रवादीवडील खासदार

10) जिल्हा - लातूर

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
लातूर ग्रामीणधीरज देशमुखकाँग्रेसवडील विलासराव देशमुख मुख्यमंत्री
लातूर शहरअमित देशमुखकाँग्रेसवडील विलासराव देशमुख मुख्यमंत्री
अहमदपूरबाबासाहेब पाटीलराष्ट्रवादीकाका बाळासाहेब पाटील मंत्री व आमदार
निलंगासंभाजी निलंगेकरभाजपशिवाजीराव निलंगेकर आजोबा, आई खासदार होत्या
अशोक निलंगेकरकाँग्रेसशिवाजीराव यांचा मुलगा

11) जिल्हा - उस्मानाबाद

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
तुळजापूरराणा जगजितसिंग पाटीलभाजपवडील पद्मसिंग पाटील माजी मंत्री
परंडाराहुल मोटेराष्ट्रवादीपद्मसिंग पाटील हे मामा

12) जिल्हा - परभणी

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
जिंतूरमेघना बोर्डीकरभाजपवडील रामप्रसाद बोर्डीकर 15 वर्षे आमदार, जिल्हा बँक अध्यक्ष
विजय भांबळेराष्ट्रवादीवडील माणिकराव भांबळे माजी मंत्री
परभणीरविराज देशमुखकाँग्रेसवडील अशोक देशमुख खासदार होते
सुरेश नागरेअपक्षकुंडलिकराव नागरे माजी आमदार पुत्र
मधुसूदन केंद्रेराष्ट्रवादीधनंजय मुंढे यांचे मेव्हणे

13) जिल्हा - नांदेड

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
हदगावनागेश पाटीलशिवसेनावडील बापूराव पाटील दोनदा आमदार
माधवराव पवारकाँग्रेसवडील निवृत्तीराव पवार आमदार
भोकरबापूसाहेब गोरठेकरभाजपवडील बाबासाहेब गोरठेकर 3 वेळा आमदार होते
अशोक चव्हाणकाँग्रेसवडील शंकरराव चव्हाण 1956 ते 2002 पर्यंत विविध पदांवर
नांदेड दक्षिणराजश्री पाटीलशिवसेनापती हेमंत पाटील हिंगोलीचे सध्याचे खासदार
लोहामुक्तेश्वार धोंगडेशिवसेनावडील भाई केशवराव धोंगडे 40 वर्षे आमदार व खासदार होते
दिलीप धोंगडेराष्ट्रवादीवडील शंकरअण्णा धोंगडे आमदार होते
नायगाववसंतराव चव्हाणकाँग्रेसवडील बळवंतराव चव्हाण 2 टर्म आमदार
देगलूरसुभाष साबणेशिवसेनावडील आमदार होते
मुखेडतुषार राठोडभाजपकाका किशन राठोड आमदार होते व वडील निवडून येऊन 2014 मध्ये लगेच मृत्यू

14) जिल्हा - हिंगोली

मतदारसंघउमेदवारपक्षकुटुंबातील कोण आमदार, खासदार होते किंवा आहे
शिवाजीराव जाधवअपक्ष (भाजप पुरस्कृत)वडील आमदार
हिंगोलीभाऊराव गोरेगावकरकाँग्रेसकाका आमदार
बातम्या आणखी आहेत...