आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन:मुंबई महापालिका प्रभाग रचनेची एसीबीकडून, गैरव्यवहारांची कॅगकडून चौकशी- मुख्यमंत्री

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

शिवसेनेला घेरण्याची रणनीती शिंदे, फडणवीस सरकारने आखली आहे. आज विधानसभेत याची प्रचिती आली. मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. तर उपमुख्यमंत्री यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून कालबद्ध चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले.

दोषींवर कारवाई होणार

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र महानगर पालिका सुधारणा विधेयक (2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19) मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत मांडले. यावर त्यांनी सविस्तर निवदेन दिले. महापालिकेच्या वॉर्डरचनेबाबत संभ्रम निर्माण केला गेला. नवीन वॉर्डरचनेबाबत दोषी आढळणाऱ्याला पाठीशी घेतली जाणार नाही, तसेच सूडभावनेने कोणावरही कारवाई होणार नाही.

विरोधकांना जोरदार टोला

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''आम्ही बेकायदेशिर सरकार स्थापन केले नाही. उलट ते लोकशाहीने स्थापन झालेले सरकार आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. या देशात नियम, कायदे आहेत त्याविरुद्ध आम्ही गेलोच नाही, जाणारही नाही. आम्हाला कुठलीही भीती नाही. घटनाबाह्य कृती आम्ही कधीच केली नाही. हिच सर्वांची अडचण झाली.'' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

सुप्रिया सुळेंची थेट शहांकडे तक्रार:मविआ आमदारांना धमकावणारा शिंदेगटाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाल्या- त्यांना लोकशाही मूल्ये शिकवा!

सत्ताधारी-विरोधकांचे अशोभनीय वर्तन, विधान भवनाच्या पायऱ्यांवरच भिडले, 'खोके-बोके'त वेळ वाया

D
D

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मागील 4 दिवस वादळी ठरल्याने आज विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेत मंगळवारी शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. यावरुन काल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

बावनकुळेंची दिल्लीतून जोरदार टोलेबाजी:तीन चाकाच्या ऑटोची स्पीड आणि बुलेटची स्पीड यात भरपूर फरक

गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. तर मुंबईतील खड्डे ट्राफिकचा प्रश्नावर चांगलेच वातावरण तापले होते.यासर्व गोष्ट्रींच्या पाश्वभूमीवर अधिवेशपाचे दोनच दिवस उरल्याने आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोले लगावले होते. यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलं. दुष्काळावरुन सुरु झालेली चर्चा सभागृहातून वॉकआऊटपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला.

खोक्यावरून गाजले अधिवेशन

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथ्या दिवस आहे. आजही 50 खोक्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच हातात बिस्कीट घेत 'फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

महत्त्वाचे अपडेट

 • विधानसभेत फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले - अधिवेशनातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापले. प्रश्नोत्तरांची उत्तर योग्य पद्धतीने देण्याच्या सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या. खरी उत्तरे नाही, यापुढे असे खपवून घेणार नाही. बऱ्याच प्रश्नांच्या लेखी उत्तरात हे खरे नाही असे उत्तर दिले जाते यावरून फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापले.​​​ ​​​
 • महेश शिंदे म्हणाले आमच्या आंदोलनालास गालबोट लावण्याचा प्रकार काही जणांकडून झाला. गैरकारभार आम्ही मिडीयासमोर सांगत असल्याने त्यांना ते सहन झाले नाही. महाराष्ट्राच्या विचारधारेवर पडलेला काळा डाग असा अमोल मिटकरींचा उल्लेख अमोल मिटकरींसारख्या लोकांमुळे लोकशाहीला धोका आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली सत्य कटू असल्याने त्यांना पचले नाही. विरोधकांना आमच्या घोषणा सहन झाल्या नाही. बारामतीला गेलेले आणि लुटलेले पैसै बघा असे महेश शिंदेंनी म्हटले आहे. विरोधकांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली आम्ही केली नाही बाळेसाहेबांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक.
 • छगन भुजबळ म्हणाले मी 1985 ला या सभागृहात आल्यानंतर नियम कडक होते. मात्र या ठिकाणी आता नियम पाळले जात नाही, आता तर सभागृहात शिस्तही पाळली जात नाही.
 • सुहास कांदे आक्रमक भुजबळांविरोधात अपील न करण्याच्या निर्णयावरुन शिंदे गटातील आमदार सुहास कांदे आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देऊनही सुहास कांदे शांत झाले नाही.
 • यशोमती ठाकूर म्हणाल्या की, याठिकाणी कायदे-सुव्यवस्था आपण बनवत असतो. त्यामुळे याठिकाणी अशाप्रकारे भांडणे चुकीचे आहे. धमकावणे सुरुच आहे. आज महाविकास तोडण्याचा जो प्रकार झाला तो ईडी-सीबीआयचा वापर करुन झाला. विरोधकांना संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला आहे. विरोधकांचा आवाज तुम्ही थांबवू शकत नाही. अशी संतप्त प्रतिक्रीया काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.वाचा सविस्तर
 • विधानसभेत सुहास कांदे आक्रमक म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केलचं वाचा सविस्तर
 • आमदार अमोल मिटकरी म्हणाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मक्रार केली आहे. मविआ ओला दुष्काळाच्या संदर्भात आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी शिंदे नावाचे सत्ताधार पक्षातील आमदारांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केनी असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.वाचा सविस्तर
 • उदय सामंत म्हणाले विरोधकांनी टीका करताना विचार करुन टीका करायला हवी. अंगावर आले तर कुणीही शिंगावर घेते. सुरूवात झाली नसती तर असे झाले नसते, समोरुन बोलताना विचार केला पाहिजे त्यांचे पडसाद असे असतात असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
 • प्रवीण दरेकर म्हणाले आमच्याकडून कुणाला धमकावण्याचा प्रयत्न नाही, विरोधीपक्ष वैफल्यग्रस्त आहे.विरोधकांना केवळ राडा करायचा आहे. त्यांना केवळ नौटंकी करायची आहे. लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून हे सर्व सुरू असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
 • सत्ताधारी पक्षातील आमदारांना विरोधकांच्या घोषणा झोबल्या, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी धक्काबुक्की केली. हे सत्तेत कसे आले हे सर्वांना माहिती आहे. ही संस्कृती राज्याची नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
 • आम्ही कुणाला धमकावले नाही, त्याची गरज आम्हाला नाही - आमदार लांडे
 • भरत गोगावले म्हणाले आम्ही जे केले नाही ते आरोप विरोधकांनी केले. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. 50 खोके आम्ही काही घेतले नाही, यांचे अनिल देशमुख, नवाब मलिक आतमध्ये का बसलेत? - शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंचा सवाल वाचा सविस्तर
 • भरत गोगावले म्हणाले सगळा घोटाळा बाहेर काढल्याने पोटशूळ उठला, आम्ही काम करत होतेो आणि हे लोक त्यावेळी खात होते. त्यांनी आम्हाला धक्कागुक्की केली नाही आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली, भरत गोगावलेंची कबुली
 • अमोल मिटकरी आणि महेश शिंदेमध्ये धक्काबुक्की; विधानभवनाच्या पायऱ्यावर हाणामारी
 • सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोबल्या; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
 • विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी, विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी
 • अमोल मिटकरी म्हणाले एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनी शिवीगाळ केली.आई-बहिणीवरुन शिवीगाळ झाल्याचा अमोल मिटकरीचा आरोप
 • घरातून बाहेर न पडणारे कसे निवडणुका जिंकणार?, प्रसाद लाड यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले
 • भाजप मुंबईचे महामंत्री आ. अमित साटम यांनी विधानसभेत कलम 293 अन्वये मुंबईवरील चर्चेवर बोलतांना खालील मागण्या केल्या
 • बीएमसीमध्ये गेल्या 25 वर्षांतील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी.
 • एरंगळ, मढ येथील बेकायदेशीर शूटिंग स्टुडिओ पाडणे .
 • मागील सरकारमधील सीसीटीव्ही घोटाळ्याची चौकशी ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची परवानगी देण्यात आली आणि नंतर इंटरनेट उपकरणे बेकायदेशीरपणे खांबांवर लावून इंटरनेट कंपन्यांना भाड्याने दिली होती.
 • वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के; उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाची घोषणाबाजी
 • उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर भाजपसह शिंदेगटाचा हल्लाबोल
 • विधानभवनाच्या पायऱ्यावर भाजप- शिंदे गट आक्रमक
 • बीएमसीचे खोके मातोश्री ओके अशी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी
 • लवासाचे खोके बारामती ओके अशा घोषणादेत राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे
 • धर्मपरिवर्तनाच्या मुद्द्यावर विधानसभेत आमदार नितेश राणेंकडून लक्षवेधी वाचा सविस्तर
 • नितेश राणे म्हणाले अहमदनगरमधील मराठी मुलीचं धर्मपरिवर्तन, मुलीचं धर्मपरिवर्तन केल्याप्रकरणी लक्षवेधी, हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते – नितेश राणे
 • देवेंद्र फडणवीस म्हणाले धर्मांतर विरोधी कायदा अधिक कडक करू नितेश राणेंच्या लक्षवेधीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
 • केसरकर म्हणाले राज ठाकरेंबद्दल एकही शब्द बोलणार नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे वक्तव्य वाचा सविस्तर
 • पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपासून मदत; मुख्यमंत्र्यांची माहिती
 • 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल - दीपक केसरकर

काल काय घडले?

 • विधासभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना आदित्य ठाकरे म्हणाले, बंडखोरांनी गद्दारी केली आहे. म्हणून त्यांना गद्दारच म्हणणार. भाऊ असते तर भाऊ म्हटले असते. पण, कुटुंबाचे नाते तोडून पाठीत खंजीर खुपसून ते गेले आहेत. वाचा सविस्तर
 • विधानसभेत सादर झालेल्या एका प्रस्तावात विधान परिषद असा उल्लेख होता. अजित पवारांनी ही चूक निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. अजित पवार म्हणाले, तुम्ही सातवे वेतन आयोग घेऊन काम करतात. फुकट काम करत नाही. ज्याची कुणाची ही चूक असेल त्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी. यावर मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
 • संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मविआतील घटक पक्षांची विधिमंडळात बैठक होत आहे. बैठकीस उद्धव ठाकरेही हजर राहणार आहेत. वाचा सविस्तर
 • दहीहंडीतील दुर्घटनेमुळे मृत्यू झालेल्या मुंबईतील गोविंदाला 10 लाखांची तातडीची मदत सरकार करेल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गोविंदांचा तातडीने विमा काढून मदत करण्यात येईल किंवा मुख्यमंत्री निधीतून गोविंदाला मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार आक्रमक

काल अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुंबईत झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीदरम्यान जखमी होणाऱ्या गोविंदांना 7 लाख तर, मृत गोविंदांना 10 लाखांची मदत करण्याची घोषणा केली होती. विलेपार्ल्यातील एका दहीहंडीत थर कोसळून एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता. त्याचा आता मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मात्र, या गोविंदाला अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे सभागृहात हा मुद्दा मांडणार आहोत.

गोविंदांना सरकारने स्वत:च्या तिजोरीतून मदत करावी

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या आदल्याच दिवशी गोविंदांचा 10 लाखांचा विमा काढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे गोविंदा पथकांना विमा काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे अशा गोविंदांना सरकारने स्वत:हून आपल्या तिजोरीतून मदत करावी, अशी मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत.

अधिवेशनात लक्षवेधी

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र, सरकारने त्यांच्यासाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, यासाठी तसेच इतर अनेक मुद्द्यांवर लक्षवेधी मांडणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

परवा काय झाले?

शिंदे-फडणवीस सरकारने सरपंच व नगराध्यक्षांच्या निवडी थेट जनतेतून करण्याचे विधेयक मोठा विरोध असतानाही सोमवारी मंजूर केले. ग्रामीण भागात पक्षाचे प्राबल्य निर्माण करण्याकामी थेट निवडीचा लाभ भाजपला होणार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील, संजय कुटे, पृथ्वीराज चव्हाण, हरिभाऊ बागडे, नितेश राणे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी मत मांडले.b यासंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकांत १९७४ पासून सुधारणा केली जात आहे. राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. नगराध्यक्षाला वाढीव अधिकार देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यानुसार आवश्यकता असल्यास विधेयकात फेरबदल करता येईल. पारदर्शक कारभारासाठी जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्यासंदर्भातील विधेयक महत्त्वपूर्ण आहे.

आघाडीचे 7 निर्णय फिरवले

सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारने आघाडीचे मोठे ७ निर्णय फिरवले आहेत. त्यामध्ये मेट्रो कारशेड आरेमध्ये करणे, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क, महापालिका प्रभाग रचनेत बदल, जिल्हा विकास नियोजन निधीच्या खर्चास स्थगिती, मुंबईत पुन्हा २२७ प्रभाग असे निर्णय करत आघाडीला धक्का दिला. त्यात आता सरपंच व नगराध्यक्षांच्या थेट निवडीची भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...