आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:पार्किंगच्या वादात दोन कुटुंबात हाणामारी, एकाने दुसर्‍याचे डोके फोडले; कॅमेरा कॅद झाली घटना

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या नायगाव भागातील पॉश सोसायटीत दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून त्यात एक व्यक्ती दुसर्‍यावर दगडाने हल्ला करताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, पार्किंगमुळे दोघात वाद सुरू झाला आणि नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

घटना नायगाव परिसरातील मोहन नक्षत्र ग्रीन कंपाउंड नावाच्या बिल्डिंगमधली आहे. येथे राहणाऱ्या अनुराग पटेलवर त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विनोद आणि श्रेयाने हल्ला केला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

व्हिडिओ फूटेजच्या आधारावर गुन्हा दाखल

या मारहाणीचा व्हिडिओ तेथे उपस्थित एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि पोलिसांना दिला. या आधारे विनोद आणि श्रेयावर गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओत विनोद शिव्या देताना आणि अनुरागवर हल्ला करताना दिसत आहे.