आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:कृषी कायदे रद्द न केल्यास राज्यभरामध्ये लढा तीव्र करणार; नाना पटोलेंचा इशारा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाबाबत खोटी माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी केली

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर नवीन कृषी कायदे बनवले. या कायद्यांविरोधात आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अन्यायी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद करण्यात आला असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशी गेले आहेत. सरकारच्या विरोधात आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने शुक्रवारी राज्यभर लाक्षणिक उपोषण केले. मुंबईत मंत्रालयासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी काँग्रेस नेते व मंत्र्यांनी उपोषण केले. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदींनी सहभाग घेतला.

या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्यांविरोधात एकवटला असताना मोदी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. हुकूमशाही वृत्तीच्या या सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोही संबोधून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. आता त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून नवीन कृषी कायदे केले पाहिजेत. हे नवीन कृषी कायदे संसदेच्या स्थायी समितीसमोर ठेवावेत, असेही सांगितले.

फडणवीसांनी बदनामी केली
पोलिस बदल्यांसाठी मोठे रॅकेट चालते, असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करून दिला होता. पण, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने तो दावा धादांत खोटा निघाला आहे. शुक्ला यांनी अहवालासोबत कोणताही पेनड्राइव्ह दिला नव्हता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाबाबत खोटी माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी केला.

बातम्या आणखी आहेत...