आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाई आक्रमक:म्हणाल्या- कोरोना महामारी आहे, चेष्टेचा विषय नाही, जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरतोय; त्यामुळे इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कोरोनांबंधीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. इंदुरीकर महाराज कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला. याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा असेही देसाई यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
इंदुरीकर दरवेळेस कीर्तनातून काहीतरी बरगळत असतात. मागच्या वेळी त्यांनी लस घेणार नाही, असे सांगितले तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. याआधी अनेकदा महिलांबद्दल बोलले तेव्हाही काहीही झाले नाही. आता पुन्हा त्यांनी तिसऱ्या लाटेबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, मी माळकरी आहे म्हणून कोरोना होणार नाही. किर्तनातून चुकीचे संदेश इंदुरीकर हे देत आहेत. असे असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नेहेमी त्यांची पाठराखण करत आहेत.

इंदुरीकर यांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय असे काही आहे का? हे आरोग्यमंत्री यांनी सांगावे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. ज्याप्रमाणे कोरोनाची इंदुरीकर महाराज चेष्टा करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून राज्यात समान न्याय आहे हे दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...