आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कणकवली:पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करा, भाजपने कणकवली पोलिसांना दिले निवेदन

रायगड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस कर्मचारी विश्वजित परब यांच्यावर कोणतीही तक्रार न देण्याचा दबाव आणल्याचा आरोप

खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने पोलिसाला केलेल्या दमदाटी प्रकरणी सिंधुदुर्गात राजकारण तापले आहे. आज कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांची भेट घेत भाजपाने खासदार पुत्र गीतेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी खासदार राऊत यांचा मुलगा गीतेश हा आपल्या ताब्यातील एम.एच 02 एफइ 345 ही कार घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिस कर्मचाऱ्यानी त्याला कणकवली चौकातील पर्यायी मार्गाने जायला सांगितले.मात्र भडकलेल्या खासदार पुत्राने येथे ड्युटीवर असलेल्या ट्राफिक पोलिसाला धमकावले. यावरून कणकवलीत राजकीय वातावरण तापले आहे. 

भाजपाच्या वतीने आज पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. वाहतून पोलिस विश्वजित परब यांच्यावर पालकमंत्री आणि विनायक राऊत यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रकार सुरू आहे. तो थांबवा. अशी मागणी या निवेदनातून करण्यात अली आहे. जर गीतेश राऊत याच्यावर  गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हयात उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही भाजपने दिला आहे.  यावेळी कणकवली भजापा अध्यक्ष संतोष कानडे, जिप सभापती बाळा जठार,माजी जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे,भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत,पंस सदस्य मिलिंद मेस्त्री,युवक जिल्हासेक्रेटरी संदीप मेस्त्री, आदी उपस्थित होते.

या प्रकरणी कोणतीही तक्रार देऊ नये असा दबाव वाहतूक पोलिस कर्मचारी विश्वजित परब यांच्यावर आणला जातोय असा आरोप यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कांदे यांनी केला. 

तर परब हे एक कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत. मात्र त्यांची मानसिक स्थिती आता चांगली नाही असे कारण पुढे करून त्यांना तक्रार देण्यापासून रोखले जात आहे. असा आरोप भाजप माजी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे यांनी केला आहे.