आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरूद्ध औरंगाबादेतील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत भ्रष्ट्राचार प्रकरणात त्यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केले होते. या प्रकरणात शिवसेनेकडून तक्रार करण्यात आली असून देशद्रोह आणि भ्रष्ट्राचार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा अशी मागणी निवेदनाद्वावारे करण्यात आली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विराट जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेल्या 58 कोटींचा निधी हडप केला, असा आरोप केला होता.
राऊत सोमय्या यांच्यीत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील शिवसेना आता सोमय्यांविरूद्ध आक्रमक झाली आहे. औरंगाबादेतील शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत यांच्या नैतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळाने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गणपत दराडे यांना आज तक्रार दिली.
शिवसेनेने पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बेताल आरोप करीत आहे. मात्र त्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचविण्यासाठी देशभक्तीच्या नावावर 58 कोटींचा घोटाळा केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळाने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात निरीक्षक गणपत दराडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ऍड. अशोक पटवर्धन, अनिल जैस्वाल, अखिल शेख, निलेश सेवेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
रक्कम गेली कुठे?
किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्था आणि देशभावनेची शुद्ध फसवणूक केली आहे. भाजपचा झेंडा घेऊन किरीट सोमय्यांनी 58 कोटी रूपये गोळा केले आहेत. हा आकडा 100 कोटींचा असेल ही रक्कम राजभवनात जमा झाली नसेल तर गेली कुठे, भाजपने ही रक्कम निवडणूकीत वापरली की, सोमय्यांच्या इन्फ्रामध्ये वळविली असा प्रश्नचिन्ह शिवसेनेने लावला असून रक्कम कुणाच्या घशात गेली असा सवाल निवेदनात केला आहे.
राजभवनातील पत्राचा दिला संदर्भ
सोमय्यांनी देशद्रोह केला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. यासाठी राजभवनातून निधी जमा न झाल्या संदर्भातील पत्राचा हवाला त्यांनी दिला होता. त्यानंतर राज्यभरात सोमय्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार, फसवणूक व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.