आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणासंदर्भात हीन दर्जाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या संबंधितांवर मुंबई सायबर क्राइमने गुरुवारी गुन्हा नोंद केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तशी तक्रार केली होती.

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया झाली. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. पवार यांच्या आजारपणाबाबत भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा विकृतांना अद्दल घडवण्यासाठी सायबर क्राइमकडे राष्ट्रवादी युवकचे रविकांत वर्पे, सूरज चव्हाण आणि आपण तक्रार दिली होती, असे शेख यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, च्या कलम ५०५(२)/ ५००/ ५०४/ ४६९/ ४९९/ ५०७/ ३५ अन्वये तसेच आयटी अॅक्ट ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...