आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेशी 'पंगा' भोवणार?:कंगना रनोटविरोधात विक्रोळीत तक्रार दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य कंगनाने केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटविरोधात अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेली उल्लेख करत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कंगनाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कंगना आणि शिवसेनेमधील वाद आता अधीकच पेटलेला दिसतोय. अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर शिवसेना आणि कंगनात मोठा वाद सुरू झाला. दरम्यान बीएमसीने कंगनाचे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत त्याची तोडफोड केली. यानंतर कंगनाने एक व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. यावरुनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनोटविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. नितीन माने यांनी नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली.

काय म्हणाली होती कंगना?
अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी संपूर्ण सुरक्षेत तिच्या घरी परतली. यानंतर बीएमसीने तिच्या कार्यालयाची केलेली तोडफोड पाहून तिने एक व्हिडिओ ट्विट केला होता. घरी पोहोचताच कंगनाने “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत आव्हान दिले आहे. ती म्हणाली की, आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा अहंकार मोडेल. जय महाराष्ट्र.

कंगना म्हणाली, ''उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, चित्रपट माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर तोडून मोठा सूड उगवला. तुम्ही खूप मोठे उपकार केले आहे. काश्मिरी पंडितांसोबत काय घडले असेल, हे मला माहित होते. मात्र आज मला याची जाणीव झाली आहे. आज मी तुम्हाला एक वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेल. मी माझ्या देशातील लोकांना जागे करेन. ठाकरे जे क्रौर्य आणि दहशत माझ्याबाबतीत घडली आहे, त्याला नक्कीच अर्थ आहे. जय हिंद. जय भारत'', अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.