आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुस्लिम समाजाचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे युवासेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या लोकांना महागात पडले आहे. भाजप नेते आझम यांचा भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी गोरेगाव (प.) येथील बांगूर नगर पोलीस ठाण्यात ठाकरे यांच्या जवळच्या चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
पेंग्विन सेनेकडून माझी बदनामी
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे, त्या विरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केलाय. गेली 25 वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत. होऊद्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत रहा..ढासळणार आहेतच!
हिंदू-मुस्लिम समाजात तेढ
जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी अनिल कोकीळ, नीलेश पारडे, विजय तेंडुलकर आणि आकाश बागुल यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. हे सर्वजण आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांविरुद्ध भादंवि कलम 153 (ए), 426, 500, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांनी सांगितले की, ज्या लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण युवासेनेचे आहेत. या लोकांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आशीष शेलारांना खजूर खाऊ घालत असल्याचे व्हायरल फोटो फोटोमध्ये दिसत आहे.
सावंताची टीका
जर कुरेशी हाजी अराफत सारखा असतो. कुरेशी प्रामाणिकपणे काम करतात. कुरेशी कोणालाही घाबरत नाहीत. आणि जर डोकं टेकवायचे असेल तर ते फक्त देवापुढे नतमस्तक होते. या गोष्टींनी जर कुरेशी बनत असेल तर आजपासून आशिष शेलारही कुरेशी आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या याआधीच्या भाषणातील हा भाग महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. शेलारांवर निशाणा साधत ते म्हणाले, की मला आशीष शेलार यांचे हे भाषण व स्वतः चे केलेले नवीन नामकरण आवडले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शेलार यांचे हे नामकरण आवडले का, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.