आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडणीची मागणी:प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटी रुपये खंडणीची मागणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांच्याकडे 35 कोटी रुपये मागितल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी देण्यात आल्याचे कळते. धमकीनंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मांजरेकर यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून खंडणी मागितल्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अबू सालेम टोळीकडून धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतील खेड येथून 32 वर्षाच्या युवकाला काल ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, या सर्व गोष्टींचा तपास पोलिस सध्या करत आहेत.