आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गावगुंड मोदी' सापडला:नाना पटोलेंनी ज्या गावगुंड मोदीला मारण्याची भाषा केली अखेर तो माध्यमांसमोर, नेमके काय म्हणाले होते पटोले?

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी असे वक्तव्य केले होते की, 'मी मोदीला मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो.' ज्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर पटोले यांनी तात्काळ आपल्या या वक्तव्याबाबत घुमजाव करत 'मी देशाचे पंतप्रधानांविषयी नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत होतो.' असे स्पष्ट केले होते.

दरम्यान, त्यानंतर आता तो मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना सापडला असून पोलिसांनी त्याची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.

पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी मीच

नागपूरमध्ये एका वकिलाने उमेश घरडे या व्यक्तीला प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. नाना पटोले ज्या मोदीला उद्देशून बोलले हेते. तो हाच मोदी आहे, असा दावा त्यांनी केला. नाना पटोले जे बोलले ते मलाच बोलले. माझ्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मात्र मी घाबरलो होतो. त्यामुळे पुढे आलो नव्हतो, असे तो कथित मोदी म्हणाला. दरम्यान, पत्रकारांनी त्या गावगुंड मोदीला प्रश्न विचारला असता त्याची बोबडी वळली. तो व्यस्थित उत्तर देऊ शकला नाही. नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचाराला केव्हा आले होते? असा प्रश्न त्या मोदीला विचारण्यात आला. त्यावर मोदी काहीच उत्तर देऊ शकला नाही.

नाना पटोले काय म्हणाले होते?

नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे नाना पटोले म्हणाले होते. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...