आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळात सोमवारी (ता.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. परिणामी महागाई वाढली आहे. त्यावर उतारा म्हणून पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात अर्थसंकल्पात कपात केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर १ ते २ रुपये कमी होऊ शकतात. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी औद्योगिक वीज दर ९.३ टक्क्यांवरुन ७.५ टक्क्यांपर्यंत घटवले होते. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरीक वाढीव वीज िबलांमुळे हैराण आहेत. घरगुती वीज ग्राहकांना अर्थसंकल्पात अंशत: दिलासा मिळेल, अशी मोठी आशा नागरिक ठेवून आहेत.
यंदाचा अर्थसंकल्पही तुटीचा
गतवर्षी अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडला होता. तो ३ लाख ५६ हजार ९६८ कोटीचा होता. कोरोना साथीची चाहूल लागण्यापूर्वीचा तो अर्थसंकल्प ९ हजार ५११ कोटी रुपये तुटीचा होता. राज्याची हलाखीची आर्थिक परिस्थिती बघता यंदासुद्धा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची दाट शक्यता आहे. गेले काही वर्ष महसुली अंदाजाच्या व खर्चाच्या रकमा यांचा मेळ जमेनासा झाला आहे. यासंदर्भात लोकलेखा आणि अंदाज समितीने सरकारचे वेळोवेळी चांगलेच कान पिळलेले आहेत. किमान यंदा तरी या रकमांतील तफावत अल्प राहील, अशी अनुभवी वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून आशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.