आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनतेतून मागितल्या सूचना:27 फेब्रुवारीपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. राज्याचा अर्थसंकल्प कसा असावा, यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सूचना व संकल्पना मागविल्या आहेत.

२७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. लवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. वार्षिक आराखड्यासाठी बैठका झाल्या आहेत. फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

राज्यातील शाळांत साजरा होणार ‘आजी-आजोबा दिन'
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शाळांत ‘आजी-आजोबा’ दिवस साजरा करण्याचा राज्य निर्णय सरकारने घेतला आहे. जगभरात १० सप्टेंबरला आजी-आजोबा दिवस साजरा केला जात असतो.

बातम्या आणखी आहेत...