आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर निर्मला सीतारामन:अर्थमंत्री इंडस्ट्रीतील दिग्गज, लार्ज टॅक्स पेयर्स आणि निवडक प्रोफेशनल्सची घेणार भेट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येथे त्या अनेक इंडस्ट्रीतील दिग्गजांना भेटतील. येथे त्या अर्थसंकल्पोत्तर मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय त्या मोठ्या करदात्यांना आणि निवडक व्यावसायिकांनाही भेटणार आहेत.

केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसंदर्भात अर्थ मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'अर्थमंत्री 2022 च्या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रातील भागधारक, उद्योग आणि व्यवसाय, मोठे करदाते आणि निवडक व्यावसायिकांशी संवाद साधतील.' सोमवारी सकाळी 10.30 वाजता चर्चा सुरू होईल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर दुपारी 3 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन वित्तीय बाजाराच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत.

अर्थमंत्र्यांचा कार्यक्रम मंगळवारी
अर्थमंत्री मंगळवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेची (FSDC) बैठक घेणार आहेत. यापूर्वी, 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर निर्मला यांनी यापूर्वीच दिल्लीतील विविध उद्योगांशी संवाद साधला आहे. यानंतर दुपारी 3 वाजता अर्थमंत्री सार्वजनिक क्षेत्रातील बँकेसोबत अर्थसंकल्पोत्तर बैठक घेणार आहेत. हे सर्व कार्यक्रम मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहेत.

पुढील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता त्याचा दुसरा टप्पा 14 मार्चपासून होणार आहे. याआधी अर्थमंत्री अनेक इंडस्ट्री चेंबर्ससोबत बैठका घेतील आणि अर्थसंकल्पोत्तर विकास कामांबाबत सल्लामसलत करतील.

गेल्या आठवड्यात आरबीआयसोबत बैठक झाली गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेतली, जिथे डिजिटल चलन, LIC IPO यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...