आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांचा लॉकडाउन:आठवले करताहेत ऑनलाइन पक्षबांधणीचे काम, तर जोगेंद्र कवाडे रमले नातवासोबत, अॅड. प्रकाश आंबेडकरांची पुस्तक वाचनासोबतच राजकीय घडामोडींवर बारकाईने नजर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये काय करताहेत रिपब्लिकन नेते

(बालाजी सूर्यवंशी)

लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या रिपाइं पक्षाची व्याप्ती देशभरात वाढवण्यासाठी ऑनलाइनच्या माध्यमातून पक्षबांधणी सुरू केली आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर भारतीय राजकीय घडामोडींचा अभ्यास करत आहेत, तर नामांतर लाँगमार्चचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे नातवाशी खेळण्यात आणि महापुरुषांचे ग्रंथ वाचन करत आपला वेळ व्यतीत करत आहेत.

सतत दौरे, आंदोलने आणि कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात राहणारे राज्यातील रिपब्लिकन नेते लॉकडाऊनच्या कालावधीत काय करत आहेत. याचा धांडोळा ‘दिव्य मराठी’ने घेतला. इतरवेळी घरात थांबण्याची उसंतही मिळू न शकणाऱ्या या नेत्यांना लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची आयती संधी मिळाली. सुमारे दोन महिन्यांच्या या कालावधीत या नेत्यांनी त्याचा सदुपयोग करत आपली आवड-निवड, छंद जोपासले आहेत. त्याचबरोबर ‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या संस्कृतीनुसार पक्षबांधणी, राजकारणातील घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवले आहे.

जोगेंद्र कवाडे : लक्ष्मीनगर, नागपूर

चळवळीत उतरल्यापासून इतके दिवस कधीच घरी राहिलो नाही. कुटुंबातील सदस्य, नातवासोबत खेळण्याची ही पर्वणीच म्हणावी लागेल. वेळ घालवावा कसा, असा प्रश्न सुरुवातीला पडला. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज,महात्मा फुले, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी, अण्णाभाऊ साठे, संत रविदास आदी महापुरुषांच्या पुस्तकांचे वाचन करण्याचा निश्चय केला. सध्या माझे ‘द अॅनहिलेशन ऑफ कास्ट’, ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ आणि ‘मनू आणि शूद्र’ या ग्रंथाचे वाचन सुरू आहे.

रामदास आठवले : कलानगर, वांद्रे

महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या प्रांतात आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. पत्नी सीमाच्या मदतीने दररोज स्वतः दुपारी दोन तास संगणकावरून ऑनलाइन पक्षबांधणीचे काम करतो, पक्षाची ध्येयधोरणे तरुण कार्यकर्त्यांना समजावून सांगतोय. पक्ष देशपातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी आवर्जून बोलतोय. औरंगाबादेतील कार्यकर्ते मिलिंद शेळके यांना चार दिवसांपूर्वी फोन केला. त्यांच्याकडून ज्येष्ठ नेते व एकेकाळचे सहकारी गंगाधर गाडे यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतले.

प्रकाश आंबेडकर : भोसलेनगर, पुणे

लॉकडाऊनमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडी आणि सरकारच्या माध्यमातून रा.स्व.संघ देशाला अधोगतीकडे कसे नेतो आहे याचा बारकाईने अभ्यास करत आहे. बहुजन महापुरुषांचे काही निवडक पुस्तके वाचतोय. येत्या पाच वर्षांत आपला पक्ष सत्तेत कसा येईल, याचाही अभ्यास करत आहेत. तरुणांना नको त्या गोष्टींकडे जाण्यापासून परावृत्त करणे हे आपले काम आहे. तसेच समाजासह इतर विविध छोट्या समाज घटकांना न्याय देण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे, असेही आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...