आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:रेल्वे सुरू होण्यासंदर्भात खोटी माहिती देणाऱ्या टीव्ही पत्रकाराविरुद्ध एफआयआर, मुंबईत हजारोंच्या संख्येने जमले होते मजूर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार पोलिसांच्या ताब्यात, मुंबईला रवानगी

रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याचे खोटे वार्तांकन करणाऱ्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या बातमीनंतर मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजुरांनी मंगळवारी गर्दी केली असावी असे पोलिसांनी म्हटले आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, संबंधित पत्रकाराला पोलिसांनी उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले असून त्याला सविस्तर चौकशीसाठी मुंबईला नेण्यात येत आहे असेही बुधवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जारी केली आहे.

महाराष्ट्रासह देशभर लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही वाढवण्यात आला आहे. 25 मार्चपासून लागू असलेल्या या लॉकडाउनमुळे जो ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी अडकला आहेत. अशात देशाच्या विविध ठिकाणी काम करणारे दुसऱ्या शहर, गाव आणि राज्यांतून आलेले स्थलांतरित मजूर अडकले आहेत. दिवस-रात्र ते लॉकडाउन कधी सुटणार याच प्रतीक्षेत आहेत. त्यातच संबंधित पत्रकाराने मराठी टीव्ही चॅनलवर वृत्त दिले होते की लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना घरी पाठवण्यासाठी विशेष जन साधारण रेल्वे सुरू केली जाणार आहे. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने मजूर जमा झाले. यावेळी सर्वांनी आप-आपल्या घरी जाण्यासाठी सरकारकडे खासगी वाहतूक सुरू करावी अशी मागणी लावून धरली. यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात सक्तीचा वापर करावा लागला आहे.

दरम्यान, संबंधित पत्रकाराच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 188 नुसार, सरकारी आदेशाची अवहेलना, कलम 269, कलम 270, कलम 117 इत्यादींच्या तरतूदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...