आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांनी दिली जीवे मारण्याची धमकी:चेंबूरमधील सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप, भुजबळांविरोधात गुन्हा दाखल

चेंबूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुजबळांना व्हिडिओ पाठवताच धमक्या

चेंबूर येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते ललित कुमार टेकचंदानी यांनी भुजबळांविरोधात चेंबूर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, टेकचंदानी यांनी भुजबळांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. या व्हिडिओत भुजबळ हे हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे व्हिडिओ पाठवताच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, असा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.

दुबई वालोंसे गोली मरवाता हूँ!

धमकीप्रकरणी टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी भुजबळांविरोधात 506 ( 2) अंतर्गत FIR दाखल केली आहे. तक्रारीमध्ये टेकचंदानी यांनी सांगितले की, आपल्याला वेगवेगळ्या नंबरांवरून ''भुजबल साहब को मैसेज करता है, दुबई वालों को कहकर गोली मरवाता हूं तुझे'', अशा धमक्या देण्यात आल्या.

भाजपला अंडरवर्ल्ड कनेक्शनचा संशय

भुजबळांविरोधात गुन्हा दाखल होताच भाजप नेत्यांनी भुजबळांवर टीका केली आहे. भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे की, भुजबळ यांनी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. भुजबळ यांची अंडरवर्ल्ड आणि पीएफआयशी काही लिंक्स आहेत का? याचाही तपास झाला पाहिजे. अशा देशविरोधी शक्तींवर वेळीच कारवाई व्हावी. तर मध्य मुंबईचे भाजप खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, चेंबूरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना धमक्या कोणी दिल्या? या धमक्यांना माजी मंत्र्यांचे समर्थन होते का? या सर्व प्रकरणाचा तपास झाला पाहिजे.

भुजबळांविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर.
भुजबळांविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर.

भुजबळांच्या वक्तव्यामुळे वाद

छगन भुजबळ यांनी दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शाळांमध्ये सरस्वती देवीची मूर्ती ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, शाळांमध्ये देवीची मूर्ती का, असा सवालही राज्य सरकारला केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, सरस्वती ही विद्येची देवी असल्याने शाळांमधून मूर्ती हटवल्या जाणार नाहीत.

आता देवी सरस्वतीही वाचवू शकत नाही

भाजप आमदार नितेश राणे यांनीही छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले, देवी सरस्वतीचा तिरस्कार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता त्यांना देवी सरस्वतीही वाचवू शकत नाही. महाराष्ट्रात आता हिंदूत्ववादी सरकार आहे. हे लक्षात ठेवावे.

बातम्या आणखी आहेत...