आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:मुंबईतील फॅशन स्ट्रीटला आग; 10 दुकाने खाक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंुबईतील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत १० ते १२ दुकाने जळून खाक झाली. दुपारी बारा वाजता लागलेली आग आटोक्यात आली.मुंबईची फॅशन स्ट्रीट रेडिमेड कपड्यांची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. अशाच एका कपड्यांच्या दुकानाला आग लागली आणि अनेक दुकानांमध्ये पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून आता आग आटोक्यात आणण्यात आली आहे. वीकेंडमुळे बाजारात गर्दी वाढली होती आणि मोठी वर्दळ होती. अशा स्थितीत आग लागल्याने अनेक लोक घाबरले. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. येथे शंभरहून अधिक कपड्यांची दुकाने आहेत. दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग वेगाने पसरली. धूर व ज्वाला खूप उंचावरून दिसत होत्या.

बातम्या आणखी आहेत...