आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईमध्ये आग:नागपाडाच्या मॉलमध्ये 11 तासांपासून धुमसत आहे आग, 3500 लोकांना आजुबाजूच्या इमारतींमधून काढण्यात आले बाहेर, आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉलमध्ये व्हेटिंलेशन नसल्यामुळे मॉलमध्ये प्रचंड धूर झाला होता. यामुळे फायर ब्रिगेडच्या टीमने मॉलचा ग्लास तोडला यामुळे धूर बाहेर पडला.

नागपाडा परिसराच्या सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी उशीरा रात्री आग लागली. ज्यावेळी आग लागली तेव्हा मॉलमध्ये जवळपास 500 लोक होते. दरम्यान सर्वांना योग्य वेळी बाहेर काढण्यात आले आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फायर ब्रिगेडच्या 24 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान आगीनंतर आजुबाजूच्या इमारती आणि दुकानांमधून जवळपास 3500 लोकांना काढण्यात आले. गेल्या 11 तासांपासून आगीव नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

मोबाइल फोनच्या दुकानात सर्वात पहिले लागली आग
ही आग गुरुवारी रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान लागली आहे. सध्या मॉलच्या आजुबाजूची दुकाने रिकामी करण्यात आली आहेत. फायर ब्रिगेटच्या अधिकाऱ्यांनुसार मॉलच्या सेकेंड फ्लोरवरील मोबाइल शॉपमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि नंतर आग संपूर्ण फ्लोरवर पसरली. या आगीमुळे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या 11 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मॉलची काच तोडून आत पोहोचले जवान
मॉलमध्ये व्हेटिंलेशन नसल्यामुळे मॉलमध्ये प्रचंड धूर झाला होता. यामुळे फायर ब्रिगेडच्या टीमने मॉलचा ग्लास तोडला यामुळे धूर बाहेर पडला. घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडनेकर पोहोचल्या होत्या.