आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत टीव्ही मालिकेच्या सेटला आग:गोरेगाव फिल्म सिटीतील घटना, अग्निशमन दलाच्या जवानांचे घटनास्थळी मदतकार्य

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीतील 'गुम है किसी के प्यार मे' टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना घडली. आग मोठी असून या आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अद्यापही काही कलाकार या आगीत अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

गोरेगाव फिल्म सिटीतील घटना

आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे बंब गोरेगाव फिल्म सिटीत दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जवान करत आहेत. 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेचे शूटींग या ठिकाणी सुरू होते.

बचावकार्य सुरू

गोरेगाव फिल्म सिटीत लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट उठत असून आग बाजूला पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच सेटमध्ये लागलेल्या आगीत काही सहकलाकार आणि इतर व्यक्ती अडकल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...