आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्नितांडव:मुंबईतील कोविड रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर; 40 जणांवर सुरू होते उपचार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश, इतर रुग्णांना सुखरुप काढले बाहेर

मुंबईतील एका कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. या आगीमुळे रुग्णालयात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील अॅपेक्स कोविड रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मला काल संध्याकाळी अचानक आग लागली. यामुळे रुग्णालयातील 40 जणांची जीव धोक्यात सापडला होता. यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर होती. या आगीत एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान रुग्णालयातील 38 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser