आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबईची घटना:बोरिवलीमध्ये एका शॉपिंग सेंटरला आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या पोहोचल्या, रोबोटच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळच्या वेळी ही घटना घडली, यावेळी दुकानात मोजकेच लोक होते
  • सर्वात आधी बेसमेंटमध्ये आग लागली, ही आग पसरत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली

शनिवारी पहाटे बोरिवली पूर्व येथील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे 14 वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबोट्सही काम करत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सकाळची वेळ असल्यामुळे शॉपिंग सेंटरवर मोजकेच लोक उपस्थित होते.   इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या तळघरात सर्वात पहिले ही आग लागली नंतर दुसर्‍या मजल्यापर्यंत पसरली. वेंटिलेशनसाठी जेसीबीच्या मदतीने इमारतीच्या बाजूच्या ग्रील तोडल्या गेल्या. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार ही लेव्हल 4 ची आग होती.

रोबोटद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे

मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगडाले यांनी सांगितले की, आग पसरू नये म्हणून अग्निशमन दलाचा रोबोट तैनात करण्यात आला आहे. तो आत शिरतो आणि आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. आग विझविण्यासाठी 14 फायर इंजिन आणि 13 जंबो टँकरचा वापर केला जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका दुकानाला आग लागल्याचा दावा परिसरातील सुरक्षा प्रभारीने केला आहे.

कॉम्प्लेक्समध्ये 77 दुकाने, कोट्यवधींचे नुकसान झाल्याची शक्यता 

येथील सुरक्षा प्रभारी म्हणाले- ही आग पहाटे 2:55 वाजता सुरू झाली. आमच्या गार्डने अग्निशमन दलाला फोनद्वारे माहिती दिली. कॉम्प्लेक्सच्या आत 77 दुकाने आहेत. हे सर्वजण मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करतात. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जेसीबीच्या मदतीने या ठिकाणी व्हेंटिलेशनचे काम केले जात आहे.

रोबोटचे वैशिष्ट्य

मागील वर्षी जुलै 2019 मध्ये मुंबई फायर ब्रिगेडला हा रोबोट मिळाला होता. या फायर प्रूफ रोबोची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. हा रोपो आत प्रवेश करतो आणि आग विझवतो. सुमारे 400-500 किलो वजनाच्या या रोबोटमध्ये थर्मल कॅमेरे आहेत जे धूरातही स्पष्ट चित्र घेऊ शकतात.

0