आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोंबिवली:​​​​​​​मानपाडा भागातील कामगार छावणीला भीषण आग, एक मजूर ठार; तर एक गंभीर जखमी

ठाणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज सकाळी 06:50 वाजताच्या सुमारास मानपाडा येथील कामगार छावणीला ही भीषण आग लागली.

डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, अनेक किलोमीटर अंतरावरूनही आग स्पष्टपणे दिसत होती. या आगीमध्ये एका कामगारचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

आज सकाळी 06:50 वाजताच्या सुमारास मानपाडा येथील कामगार छावणीला ही आग लागली. सदर घटनास्थळी कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचेन 2-फायर वाहन उपस्थित होते. ही आग आज सकाळी 10:10 वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि एक व्यक्ती जखमी झालेली असून त्यांना उपचारासाठी नेपच्यून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वसाहतीत कामगारासाठी अनेक खोल्या उभारण्यात आल्या होत्या. या सर्व खोल्या आगीत खाक झाल्या आहे. आग लागताच कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. तरीही एका कामगाराने जीव गमावला. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर आग आटोक्यात आणली आहे.