आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील मॉलमधील आग शमली:3 मजली मॉलमधील आगीवर तब्बल 36 तासांनंतर नियंत्रण, कुलिंग प्रक्रिया सुरू; आगीत 2 हजार कोटींचे नुकसान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी उशिरा रात्री घेतला परिस्थितीचा आढावा
  • गुरुवारी रात्री आग लागली, त्यावेळी मॉलमध्ये 500 लोक होते, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईच्या नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा लागलेली आग तब्बल 36 तासांनंतर शमली. आता मॉलमध्ये कुलिंगचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळी मॉलच्या काही भागातील आग विझवण्यात आली होती. या मॉलमध्ये 1200 दुकाने होती, या आगीत त्यांचे 80% नुकसान झाले आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. ठाकरे यांनी आगीत झालेल्या नुकसानीचा आणि बचावचा आढावा घेतला.

या आगीमुळे सुमारे 2 हजार कोटींचे नुकसान झाले. आग लागली तेव्हा मॉलमध्ये 500 लोक उपस्थित होते. या सर्वांना वेळेवर बाहेर काढण्यात आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासोबतच आसपासच्या इमारतींमधील 3500 लोकांना वाचवण्यात आले. तीन मजली मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील एका दुकानात लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

15 मिनिटांत संपूर्ण मॉलमध्ये पसरली आग

मॉलमध्ये दुकान असलेले व्यापारी चेतन राठोड यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दुकानात आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र काही वेळात आग पुन्हा भडकली. केवळ 15 मिनिटांत संपूर्ण मॉलमध्ये आग पसरली होती.

9 वर्षांपूर्वी सहारा मार्केटच्या आगीनंतर या मॉलमध्ये शिफ्ट झाले होते मोबाईल व्यवसायिक

सीए सत्येन्द्र बिश्नोई म्हणाले की, ''मुंबईच्या सहारा मार्केटमध्ये 2011 मध्ये आग लागली होती. या आगीत मोबाइल व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर ते सहारा मार्केटमधून सिटी मॉलमध्ये आले होते.'' व्यापारी अर्जुन सिंह म्हणाले की, मॉलमध्ये त्यांची 3 दुकाने होती. या दुर्घटनेनंतर त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.