आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्लामध्ये 'बर्निंग बाइक'चा थरार:पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी गाड्यांना आग, 20 गाड्या जळून खाक

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या 20 मोटारसायकलला आग लागल्याची घटना आज पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोटारसायकलला आग लागली की, कोणी मुद्दामून लावली? याचा तपास सध्या सुरु आहे. आज पहाटे 4 च्या सुमारास पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 दुचाकी गाड्यांना अचानक आग लागली. त्यावर काही मिनीटांतच ही आग वाढत गेली. या घटनेमुळे संपुण कुर्ला परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अग्निशमन दलाला आगीची सुचना दिली असता त्यांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र घटनास्थळातील सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहे. त्यामुळे दुचाकीस्वरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कुर्ला पोलीस घटनेचा तपास करत असून आग लागली कि कोणी मुद्दामून लावली याचा शोध सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...