आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका:मुंबईत 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे पहिला मृत्यू, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 63 वर्षीय महिलेने गमावला जीव

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात डेल्टा प्लसचे 65 रुग्ण

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका राज्यात वाढू लागला आहे. घाटकोपरमधील 63 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू असून हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे. 21 जुलै रोजी ही महिला संक्रमित झाली होती, त्यानंतर उपचारादरम्यान 27 जुलै रोजी तीने रुग्णालयात जीव सोडला. गुरुवारी आलेल्या अहवालातून संबंधित महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाले असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे या महिलेने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. कोरोनापाठोपाठ आत डेल्टा प्लस व्हेरिएंटने ही राज्यात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे.

राज्यात डेल्टा व्हेरिएंटमुळे आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहे. यापूर्वी 13 जून रोजी रत्नागिरीत 80 वर्षीय महिलेचा यामुळे मृत्यू झाला होता. मुंबईत 7 लोक डेल्टा व्हेरिएंट संक्रमित असल्याचे राज्य सरकारने बीएमसीला सांगितले होते. त्यानंतर बीएमसीने संबंधित भागाचा सर्वे करत लोकांशी संवाद साधला. दरम्यान, घाटकोपरमध्ये मृत्यू झालेली महिलेचा यात 7 लोकांमध्ये समावेश होता.

संपर्कात आलेल्या इतर 2 रुग्णांनाही डेल्टा प्लसची लागण
घाटकोपरमधील महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर 6 लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये 2 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अजून काही लोकांचा अहवालाची प्रतिक्षा असल्याचे मुंबई आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

सुरुवातीला घरातच उपचार
डॉ गोमोर म्हणाल्या की, संबंधित महिला इंटरस्टिशियल फुफ्फुस आणि अडथळा असलेल्या वायुमार्गाने त्रस्त होती. सुरुवातील या महिलेवर घरीच उपचार सुरु होते. त्यानंतर 24 जुलै रोजी या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. दोन दिवसांनी उपचारदरम्यान तीचा मृत्यू झाला.

राज्यात डेल्टा प्लसचे 65 रुग्ण
डेल्टा प्ल्स व्हेरिएंटचा राज्यात प्रार्दुभाव वाढत आहे. बुधवारी राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे 20 प्रकरणे आढळून आले आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा आकडा 65 वर पोहोचला आहे. यामध्ये 32 पुरष तर 33 महिलेचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...