आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागच्या राजाची पहिली झलक:गणरायाचे रूप पाहून भक्तांच्या आनंदाला उधाण; पाहा लालबागच्या 89 व्या गणेशोत्सवाचा व्हिडीओ

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लाल बागच्या गणपतीला पाहण्याची भक्तांची प्रतिक्षा संपली. लाडक्या बप्पांची पहिली झलक पाहताच भक्तांनी जयघोष सुरु केला अन् बप्पांची आकर्षक मूर्ती अनेक भक्तांनी डोळ्यात साठवून ठेवली.

लालबागचा गणपतीच्या दर्शन व्हावे ही, प्रत्येक गणेशभक्ताची आस असते. बप्पांच्या मूर्तीचे एक वेगळाच उत्साह या लालबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा गणेश कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.

निर्बंधमुक्तीने दिलासा

मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बंध असल्याने लालबागचा दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आला नाही. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येत आहे. लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपले 89 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करीत आहे. यंदा मंडळातर्फे बुधवारी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.

बाप्पाची झलक ऑनलाइनही

लालबागच्या राजाची पहिली झलक लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन पाहायला मिळणार आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत असतात.

मंडपातच घडवतात मूर्ती

जून महिन्यात लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा मांगल्यमय आणि जल्लोषात झाला. गणेशोत्सवाची चाहूल लागली की, लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे.

बातम्या आणखी आहेत...