आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांवर कोरोना रुग्ण, 5493 नवे बाधित, 156 मृत्यूंची नोंद, रुग्णसंख्या 1,64,626

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ५ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची भर पडली. रविवारी एकूण ५,४९३ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६४,६२६ झाली आहे. त्यापैकी ८६ हजार ५७५ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के आहे, तर ७० हजार ६०७ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. रविवारी राज्यभरात एकूण १५६ मृत्यंूंची नोंद झाली. त्यापैकी गेल्या ४८ तासांतील ६० मृत्यू असून ९६ मृत्यू मागील दिवसातील आहेत.

औरंगाबादेत रुग्णसंख्या ५ हजार पार
औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्येने रविवारी ५ हजारांचा आकडा पार केला. दिवसभरात २७१ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ५०३७ वर गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता २४७ झाली आहे. दिवसभरात ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

जालन्यात प्रथमच एका दिवसात ४३ रुग्ण
जालना जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक ४३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५०५ झाली आहे. नांदेडमध्येही रविवारी १८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तेथील रुग्णसंख्या आता ३६७ झाली. दुसरीकडे दिवसभरात १९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला अाहे. आतापर्यंत ३३६ रुग्ण काेरोनावर मात करून घरी गेले आहेत. दरम्यान, रविवारी परभणी जिल्ह्यातीलही चार संशयितांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात परभणी शहरातील दोन, तर जिंतूर शहरातील दोघांचा समावेश आहे

मराठवाड्यात ३५६ रुग्ण
रविवारी मराठवाड्यात ३५६ रुग्णांची भर पडली असून त्यापैकी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात २७१ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तर उर्वरित मराठवाड्यात ८५ रुग्णांची भर पडली. यात जालना जिल्ह्यात तब्बल ४३ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नांदेड येथे १८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. लातूर १७, परभणी ४, तर उसमानाबादेत ३ रुग्णांची भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...