आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी तयार केलेल्या एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे(आयएफएलओडब्ल्यूएस) शुक्रवारी उद्घाटन केले. मान्सून काळात ही यंत्रणा मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार, याप्रमाणेच अगदी वादळासारख्या संकटाचीही पूर्वसूचना मिळेल. उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे उपस्थित झाले होते.
बीएमसीच्या मदतीने तयार झाले तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानाला अर्थ सायंस मंत्रालय आणि बृहन्मुंबई महानगर पालिके (बीएमसी) ने सोबत मिळून तयार केले आहे. उद्घाटननंतर उद्धव ठाकरे व्हिडिओ कांफ्रेंसमधून म्हणाले की, “पूर इशारा तंत्रज्ञान शहरासाठी वरदान आहे आणि यामुळे मुंबईला वाचवण्यास मदत मिळेल. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागात गटार, नदी यातील पाण्याची होणारी रिअल टाईम हालचाल, त्याचे प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य होईल. यामुळे मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचवणे शक्य होणार आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
'वेळेपूर्वी सतर्क करणारे तंत्रज्ञान'
केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, या यंत्रणेच्या निमित्ताने पुराचा इशारा देणारी देशातील अत्याधुनिक यंत्रणा मुंबईत कार्यरत झाली आहे. ही यंत्रणा मुंबईसाठी खूप उपयोगी ठरणार असून ही कार्यान्वित केल्याबद्दल भारतीय हवामान खाते आणि मुंबई महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.