आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे देशात कोरोना वॉरियर्सवर हल्ले होत आहेत, तर दुसरीकडे या योद्ध्यांचा आदर देखील केला जात आहे. सशस्त्र सेनेने कोरोना वॉरियर्सचा सन्मान करण्यासाठी रविवारी तयारी केली होती. यापार्श्वभूमीवर मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तीन लढाऊ विमानांनी फ्लाय पास्ट केला. याशिवाय मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि जेजे मेमोरियल हॉस्पिटलमध्येही फुलांचा वर्षाव केला. मरीन ड्राईव्हवर भारतीय वायुसेनेच्या एस 30 या लढाऊ विमानाद्वारे फ्लाय पास्ट केला. तर 1.15 वाजता मरीन ड्राइव्हवर सी130 परिवहन विमान फ्लाय पास्ट करणार आहे.
आजच्या कार्यक्रमाबाबत भारतीय सैन्य दल, भारतीय वायुसेना आणि राज्यातील विविध भागातील भारतीय नौदल यांनी कोरोनाविरूद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी विशेष तयारी केली. भारतीय हवाई दलाची विमान फ्लाय पास्ट करतील, तर लष्कराचा बँड सादरीकरण करून कोरोना वॉरियर्सचे आभार मानेल. इंडियन एअरफोर्स फ्लाय पास्ट दरम्यान हॉस्पिटलमध्ये फुलांचा वर्षाव करणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या परिवहन विमान आणि लढाऊ विमानांद्वारे हा फ्लाय पास्ट होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.