आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाची दहशत:मुंबईकरांसाठी पोलिसांनी आखली दोन किलोमीटरची लक्ष्मणरेषा, गरज असल्याशिवाय पार करु नका, पोलिसांचे आवाहन 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपट्याने वाढतोय. दरम्यान मुंबईमध्ये कोरोनाने कहर केला आहे. सर्वाधिक रुग्ण हे राजधानी मुंबईमध्ये आहेत. आता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दोन किलोमीटरची लक्ष्मणरेषा आखली आहे. नागरिकांनी घरापासून दोन किलोमीटरच्याच परिसरामध्ये व्यायामासाठी जावे. तसेच त्याच परिसरतील दुकान आणि सलूनमध्ये जावे असे आवहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान कार्यालयामध्ये जाण्यासाठी आणि आपत्कालीन कामासाठी ही लक्ष्मणरेषा ओलांडण्याची परवानगी नागरिकांना देण्यात आली असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

जवळपास 3 महिन्यांपासून कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे. यामुळे दोन महिने संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन काही अटी व शर्थींसह उघडण्यात आलं आहे. मात्र नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही पुन्हा वाढत आहे. हीच रुग्णांची संख्या नियंत्रणात आणता यावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या बाहेर जाण्यावर बंदी आहे. तसेच सर्वांसाठी मास्कचा वापर करणे हे अत्यावश्यक असणार आहे. तसेच सोशल डिस्टिंगचे पालन करणे आवश्यक असणार आहे. 

Advertisement
0