आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतिहासात पहिल्यांदाच:मुंबईच्या वसई रोड स्टेशनवरुन वडोदरादरम्यान पहिल्यांदा महिलांनी चालवली मालगाडी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण मार्गावर दोन महिला लोको पायलटांनी ट्रेन चालवली

आज इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी मालगाडी चालवल्याची घटना घडली आहे. वेस्टर्न रेल्वे रुटवर एक पूर्ण मालगाडीचे संचालन महिलांकडून झाले. मंगळवारी मुंबईच्या वसई रोड स्टेशनवरुन निघालेली ट्रेन बुधवारी गुजरातच्या बडोदरामद्ध्ये पोहोचली.

पश्चिम रेल्वेचे अधिकारी आलोक कंसल याला महिला सशक्तिकरणाचे एक चांगले उदाहरण म्हटले आहे. ते म्हणाले की, हा पश्चिम रेल्वेसाठी नेहमी लक्षात राहणारा दिवस आहे. ही घटना इतर महिलांना अनुकरण करण्यासाठी आदर्श मॉडल आहे.

वसई रोड स्टेशनवरुन निघण्यापूर्वी महिला पायलटचा सन्मान करण्यात आला

पश्चिम रेल्वेचे मुख्‍य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी सांगितले की,'5 जानेवारी, 2021 ला वसई रोडवरुन वडोदरापर्यंत जाणारी मालगाडीला लोको पायलट कुमकुम सूरज डोंगरे, सहायक लोको पायलट उदिता वर्मा आणि गुड्स गार्ड आकांक्षा राय यांनी चालवले.'

इतर महिलांना मिळेल प्रेरणा

पश्चिम रेल्वेसाठी याप्रकारची ही पहिलीच घटना आहे, जेव्हा संपूर्ण महिला चालक दलाने मालगाडीचे संचालन केले. ठाकुर यांनी पुढे सांगितले की, गार्ड आणि लोको पायलटचे काम अवघड असल्यामुळे खूप कमी महिला यासाठी पुढे येतात. या घटनेमुळे इतर महिलांना या कामासाठी प्रेरणा मिळेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser