मुंबई / सोनियांच्या बैठकीत प्रथमच उद्धव ठाकरे सहभागी, मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी समिती

  • 13 कोटी मजुरांना क्रूर वागणूक : साेनिया गांधी; मजुरांची त्यांच्या मूळ राज्यांत हेळसांड : उद्धव

दिव्य मराठी

May 23,2020 08:42:00 AM IST

मुंबई. शुक्रवारी सोनिया यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात मोदी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला. सुमारे ५ तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तासभर उपस्थित हाेते. शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची उद्धव ठाकरे यांची पहिलीच वेळ.

मजुरांची त्यांच्या मूळ राज्यांत हेळसांड : उद्धव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना उपाययोजनांची माहिती दिली. स्थलांतरित मजुरांच्या पाठवणीसंदर्भात माहिती देऊन या मजुरांची त्यांच्या मूळ राज्यांत कशी हेळसांड झाली याबाबत उद्धव बोलले. तसेच जीएसटीचा राज्याचा हिस्सा केंद्राकडे प्रलंबित असल्याचा मुद्दा उद्धव यांनी मांडला.

मजुरांना आणण्यासाठी अभ्यासगट : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, विद्यार्थी संख्या घटल्याने राज्यातील शैक्षणिक संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. देशात मजुरांना परत आणण्यासाठी एक अभ्यासगट नेमण्यात यावा. राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या धाेरणांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

१३ कोटी मजुरांना क्रूर वागणूक : साेनिया गांधी

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊनमधून बाहेर कसे पडायचे याचे कुठलेही धोरण केंद्र सरकारकडे नाही. घरी जाऊ इच्छिणाऱ्या १३ कोटी स्थलांतरित मजुरांना मोदी सरकारने क्रूर वागणूक दिली, अशी टीका काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.


X