आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेत:लॉकडाऊन काळातील वाढीववीज बिलांची सक्तीने वसुली! राज्यातील 2 कोटी ग्राहकांना भुर्दंड

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काळातील वाढीववीज बिलांची सक्तीने वसुली!

कोरोनाकाळात अव्वाच्या सव्वा आलेल्या वीज बिलांमध्ये आघाडी सरकारकडून सवलत मिळण्याची आशा मावळली आहे. कारण महावितरणने वीज देयकांच्या वसुलीसंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले असून त्यात सक्तीने वसुली करण्याच्या सूचना दिल्याचे उघड झाले आहे. वाढीव वीज बिलांचे समायोजन करू, असे वारंवार सांगणाऱ्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आश्वासन हवेत विरले आहे. यामुळे राज्यभरातील सुमारे दोन कोटी ग्राहकांना वाढीव बिलांचा फटका बसणार आहे.

राज्यात मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले. परिणामी एप्रिलपासून प्रत्यक्ष मीटर वाचन न करता देयके काढण्यात आली. ती दुप्पट ते पाचपट आल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले हाेते. त्यावर मोठा संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर पुढच्या देयकात समाजयोजन करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी दिले होते. तसेच दिवाळी काळात वीज देयक समायाेजनेची सरकारकडून गोड भेट मिळेल, असे सांगून त्यासंदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिला असून तो लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीला येईल,असे आश्वासन डॉ. राऊत यांनी दिले होते. मात्र, महावितरणच्या परिपत्रकामुळे सरकार-प्रशासनात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले.

आघाडीतील तिन्ही पक्ष, सरकार अन् प्रशासनात ताळमेळ नसल्याचा फटका
१.
लॉकडाऊनच्या एप्रिल ते आॅक्टोबर काळात महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांना मिळून ३० हजार ८८२ कोटी देयके दिली. त्यातली केवळ २२ हजार ८५६ कोटी वसूल झाली आहेत.

. लॉकडाऊनपूर्वी महावितरणच्या देयक थकबाकीचा आकडा ५१ हजार १३६ कोटींवर होता. तो आता ५९ हजार १८२ कोटींवर पोहोचला आहे.
महावितरणची रग्गड कमाई तरीही... : गेल्या आर्थिक वर्षात रग्गड कमाई झाली तरीही वीज कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास महावितरणने टाळाटाळ सुरू केली होती. अखेर २२ कर्मचारी संघटनांनी ऐन दिवाळीत संपाची हाक देताच आघाडी सरकारने नमते घेतले. मात्र, २ कोटी ग्राहकांना आता वाढीव वीज बिलांचा फटका बसणार आहे.

. वाढीव देयकाच्या समायोजनास आघाडीतील ताळमेळ नसण्याचा फटका बसला आहे. काँग्रेसकडे ऊर्जा मंत्रालय असल्याने राष्ट्रवादी व शिवसेना निर्णय घेण्यात हात आखडते घेत आहेत,असेही सांगितले जाते.

. काँग्रेसने सत्तेत येताच १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यास राष्ट्रवादी व शिवसेनेचा विरोध असल्याने हा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे.

- वीज ग्राहकांनी टाळेबंदी काळात तीन-तीन महिने दुप्पट ते पाचपट देयके भरली आहेत. महावितरणच्या सक्तीच्या वसुलीच्या आदेशाने त्या वाढीव देयकाचे समायोजन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, महावितरण व आघाडी सरकारच्या विरोधात दोन कोटी वीज ग्राहकांत मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकाच वेळी भरणा करण्यास प्रवृत्त करा : परिपत्रक
महावितरणने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात लॉकडाऊन काळातली देयके कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजावून सांगा, वीज देयकाच्या वसुलीसाठी मेळावे घ्या, टप्प्याटप्प्याने वीज देयक भरण्याची सुविधा द्या, तोडगा काढून एकाच वेळी देयक ग्राहकांना भरण्यास प्रवृत्त करा, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

82 हजार कोटी रुपयांचा गतवर्षी महसूल 150 कोटी रुपये नफा महावितरणला 130 कोटी रुपये नफा महापारेषणला

बातम्या आणखी आहेत...