आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसूल गुप्तचर संचालनालय (डीअारअायने) मुंबईने अंदाजे २४ कोटी रुपये बाजार मूल्याच्या विदेशी सिगारेटच्या १.२ काेटी स्टिक जप्त केल्या आहेत. या सिगारेट तस्करीप्रकरणी एका आयातदारासह पाच जणांना अटक केली असल्याचे डीआरआयने रविवारी सांगितले. या सिगारेट भारतीय मानकांचे पालन न केल्यामुळे भारतात आयात करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे डीआरआयने एका पत्रकात म्हटले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एका कंटेनरमधून प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले होते. ते अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये पाठवले जाणार होते, असे त्यात म्हटले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरच्या हालचालीवर नजर ठेवली. न्हावा शेवा बंदरातून कंटेनर निघाल्यानंतर त्याच्या इच्छित स्थळी पोहोचण्याऐवजी तो अर्शिया एफटीडब्ल्यूझेडच्या एका गोदामाकडे वळवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी गोदामात कंटेनर अडवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.