आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजप आमदाराचे निधन:भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे प्रदिर्घ आजाराने निधन, किरीट सोमय्यांनी ट्विट करत दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तारासिंह यांची अत्यंत लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख होती.

भाजपचे लोकप्रिय माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.

सरदार तारासिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुलुंड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत लिहिले की, 'माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो' असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

नगरसेवक म्हणू राजकीय प्रवासाला सुरुवात
तारासिंह यांची अत्यंत लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख होती. जनसंघातून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी पक्षात विविध पदे भूषविली होती. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. तारासिंह यांनी मुलुंड विधानसभेचं दिर्घकाळ प्रतिनिधीत्व केलं.