आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोळशाच्या टंचाईमुळे सध्या राज्य अंधारात जाण्याची वेळ आलेली आहे. यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. आता भाजपचे नेते आणि माझी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर विविध आरोप केले आहेत. राज्य अंधारात जाण्यासाठी हे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे. सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याने राज्यावर ही वेळ आली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
ऊर्जा विभागाकडून कोळशाचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही
चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले की, कोळशाचे 2800 कोटी रुपये हे थकीत आहेत. यामुळेच महाराष्ट्रावर अंधारात जाण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचा तिन्हीही कंपन्यांसोबत ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टींगची परवानगी देण्यात आलेली नाही. यासोबतच ऊर्जा विभागाकडून कोळशाचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. कोळशाचा पुरेसा साठा नसल्याने राज्यावर संकट ओढावले असल्याचे आरोप बावनकुळेंनी केले आहेत.
अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यायला हवेत
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासली तर मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यायला हवेत. कर्ज घ्यावे असा सल्ला देखील बावनकुळे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अशा परिस्थितीच जर आमचे सरकार असते तर मी तातडीने 2800 कोटी रुपये दिले असते. तसेच दिल्लीत जाऊन बसलो असतो आणि कोळसा मिळवला असता. जर आमचे सरकार आले असते तर ही वेळ आली नसती असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
महाजेनकोकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा
ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू झाल्याच्या विषयावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाजेनकोकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा आता आहे. या कोळशाअभावी वीजनिर्मितीचे राज्यात 13-13 संच बंद झालेलेल आहे. ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्य काळोखात जाण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. ऊर्जा विभागाने योग्य नियोजन केलेले नसल्यामुळे ही वेळ आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.