आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण, जास्त त्रास नसल्याने घरीच क्वारंटाइन झाल्याची माहिती

चंद्रपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील घरी कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातत्याने वाढतो आहे. सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. तसेच या मध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण्यांचा देखील समावेश आहे. आता राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील घरी कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांनी कोरोन टेस्ट करुन घ्यातल्याने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, 'माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलेय. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी नियमानुसार स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत क्वारंटाईन व्हावे.' असे आवाहन त्यांनी केले आहे.

अधिवेशनलाही हजर नव्हते मुनगंटीवार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे दोन दिवसात आटोपण्यात आले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्याय कुटुंबातील काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली होती. याच कारणामुळे त्यांनी अधिवेशनाला जाणे टाळले होते. दरम्यान आता त्यांना सौम्य लक्षण जाणवल्यानंतर त्यांनी चाचणी केली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...