आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चांना पूर्णविराम:माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कोणतीही क्लिनचीट दिलेली नाही, सोशल मीडियावरील बातम्यांवर CBI चा खुलासा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 कोटी वसुलीच्या आरोपातून देशमुखांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याचे वृत्त समोर आले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासामध्ये क्लिनचिट मिळाल्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होत्या. यामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांना दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात होते. मात्र आता स्वतः सीबीआयने या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कोणतीही क्लिनचीट देण्यात आलेली नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुखांना कोणतीही क्लिनचीट देण्यात आलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यावरून हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले होते. ही चौकशी करण्यात आली आहे आणि त्यात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीबीआयकडून 21 एप्रिल रोजी एफआयआर दाखल केला आहे आणि त्याची प्रत 24 एप्रिलपासून सीबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या प्रकरणामध्ये अद्यापही तपास सुरू आहे' असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण ?
तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते हा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केले होते. यानंतर पासून अनिल देशमुख हे अडचणींमध्ये अडकले आहेत. या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याचं वृत्त समोर आले होते. या संदर्भातली पीडीएफ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र आता यावर सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...