आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ED समोर हजर झाले अनिल देशमुख:पाच वेळा समन्स बजावल्यानंतर अखेर ईडीसमोर हजर झाले माजी गृहमंत्री, विचारले- माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह आहेत कुठे?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

100 कोटी वसुली प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सोमवारी सकाळी 11.55 वाजता अचानक अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात पोहोचले. देशमुख यांना ईडीने ५ वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र प्रत्येक वेळी त्यांचे वकील इंद्रपाल सिंग ईडी कार्यालयात पोहोचले. देशमुख यांचे वय ७५ वर्षे असून महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ते हजर राहू शकत नाहीत, असा त्यांचा युक्तिवाद होता.

ईडी 100 कोटी वसुली प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या अँगलने तपास करत आहे. देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख आणि पत्नीला दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले, पण तेही ईडी कार्यालयात पोहोचले नाहीत. देशमुख यांच्यानंतर आज किंवा उद्यापर्यंत त्यांचा मुलगा आणि पत्नीही ईडीसमोर हजर होऊ शकतात, असे मानले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा संदर्भ दिला
यापूर्वी एका वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा हवाला दिला होता. अनिल देशमुख यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात तपास संस्थेवर आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही केला होता. ते म्हणाले होते की, आतापर्यंत मला ईडीकडून ईसीआयआरची प्रत किंवा कोणत्याही कागदपत्रांची प्रत देण्यात आलेली नाही. ज्यावरून हे समन्स केवळ प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ माजवण्यासाठी पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशमुख यांची सीबीआयसुद्धा चौकशी करत आहे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डीजी परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे, ज्यासाठी अनिल देशमुख यांना महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणी सीबीआयने आधी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि नंतर त्यात मनी ट्रेलची माहिती मिळाल्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. देशमुख यांच्या घरावर सीबीआयने दोनदा छापे टाकले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तीन महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वझे यांना दरमहा 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...