आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी गृहमंत्री व्हीलचेअरवर:अनिल देशमुख यांची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू; देशमुखांच्या खांद्याची शस्त्रक्रिया होणार?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही तपासणी सुरू असल्याचे कळते. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या अटकेत आहेत. त्यांना अद्याप जामीनासाठी कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. ते सध्या मुंबईतील ऑर्थररोड जेलमध्ये आहेत.

अनिल देशमुख यांच्या प्रकृतीत बिघाड झाला की, काय? की अन्य कारणासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात अनिल देशमुख व्हील चेअरवर बसलेले दिसत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना 2 एप्रिलपासून जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. देशमुख यांच्या खांद्याचे ऑपरेशन होणार असल्याने, वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल देशमुख सध्या ऑर्थररोड जेलमध्ये असून, सीबीआय त्यांचा ताबा घेणार होती. कोर्टाने त्यासंबधी मंजुरी देखील दिली होती. त्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने आज सीबीआय त्यांचा ताबा घेणार होती, मात्र अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन होणार असून, अजून काही दिवस देशमुख रुग्णालयात राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीआयला अनिल देशमुखांचा ताबा घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...