आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच:माजी गृहमंत्री देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, घरच्या जेवणाची विनंती सुद्धा फेटाळली

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लॉन्ड्रिग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश दिले असून सचिन वाझेनांही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुखांनी घरचे जेवण मिळाले यासाठी न्यायालयात मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या या मागणीला फेटाळून लावले आहे. न्यायालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, तुम्ही अगोदर तुरुंगातील जेवण खाऊन पाहा. त्यानंतर जर तुम्हाला आवडले नाही तर आम्ही विचार करू. असे म्हणत न्यायालयाने देशमुखांना सुनावले आहे.

आधी तुरुंगातील जेवण खाऊन पाहा
अनिल देशमुख यांनी तुरुंगात घरचे जेवण मिळाले अशी मागणी केली होती. सोबतच आरोग्याचे कारण देत त्यांनी तुरुंगात आरामासाठी बेड देण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने अगोदर तुरुंगातील जेवण खाऊन पाहा, त्यानंतर आवडले नाही तर विचार करू. असे म्हटले आहे. मात्र बेडसाठी न्यायालयाने मान्यता दिली आहे.

आरोग्याचे कारण सांगत देशमुखांनी जेलमध्ये बेडची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. ईडीने सचिन वाझेंसोबत समोरासमोर विचारपूस करण्यासाठी देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. वाझे सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असल्याने दोघांची समोरासमोर विचारपूस करण्यात आलेली नाही. या प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेले महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपुर्द केला आहे. सीबीआयने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या जबाबावरून देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली 21 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला. त्यानंतर ईडीने देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला होता. यापूर्वी देशमुख यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी संजीव पालांडे आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...