आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग प्रकरण:माजी गृहमंत्री देशमुखांना कारागृहातून हलवले, आता सीबीआय कोठडी, 100 कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या कोठडीत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ताब्यात घेतले. मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर पीएमएलएन न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. बुधवारी त्यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर काढून सीबीआय कोठडीत हलवले. भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी वाझे, शिंदे, पलांडे यांना सोमवारी सीबीआयने अटक केली.

नॉट बिफोर मी : सीबीआयने ताब्यात घेण्याच्या आदेशाला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत आव्हान दिले. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्या. पी. डी. नाईक यांनी नकार दिला. मात्र, न्यायमूर्तीद्वयींनी नकाराचे कारण नमूद केले नाही. त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती याची सुनावणी अन्य कुणा न्यायमूर्तींकडे सोपवतील.

बातम्या आणखी आहेत...