आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व हरपले!:महाडचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांचे मुंबईत निधन, कोरोनावरील उपाचारांसाठी होते मुंबईत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले

महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे आज मुंबईत निधन झालं आहे. ते यावेळी 54 वर्षाचे होते. काही दिवसापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर महाड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यामुळे कोकणासह राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कोण होते माणिकराव जगताप?
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे महाडमधील माजी आमदार होते. त्यासोबतच काँग्रेसने त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा दिली होती. जगताप यांनी गेली काही वर्षे रागयड जिल्हा परिषद अध्यक्षपददेखील सांभाळले आहे. ते बऱ्याच काळ राज्यातील राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले असल्याची भावना काँग्रेस नेते उपस्थित करत आहेत.

ट्विटवरुन दिली माहिती
महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. त्यात लिहिले की, महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

बातम्या आणखी आहेत...