आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी महापौर नरेश म्हस्केंचा अंबादास दानवेंना इशारा:जास्त टीवटीव करु नका, अन्यथा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही..!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबादास दानवे यांनी जास्त टीवटीव करु नये. अन्यथा ठाण्यातील शिवसैनिक भडकला तर तुमची पळता भुई थोडी होईल. तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय हा शिवसैनिक राहणार नाही. असा थेट इशारा ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिला आहे. यास दानवे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामनातून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले, सामना कोणी वाचत असेल असे वाटत नाही. जी काही उरलीसुरली सेना आहे तिला थांबवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. त्यातलाच हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

राज्यात नवहिंदुत्व आले

हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुले फक्त मंत्र्यांसाठी देव कोरडेच, अशी टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून करण्यात आलेली आहे. यावरुन म्हस्के यांनी सामनावर टीका केली आहे. ते म्हणाले, नवहिंदुत्व अशी जी टीका त्यांनी केली आहे त्यांच्या या म्हणण्याला मी दुजोरा देईल. गेल्या अडीच वर्षात राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार होते. ते बाळासाहेबांचे हिंदुत्व विसरले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचे वातावरण सुरु केले आहे. पुढे ते म्हणाले, सध्या सर्व सण निर्बंधमुक्त साजरे होत आहे. तर सामनातून नव्या सरकारला दादच दिली आहे.

शिंदे साहेबांमुळेच आमदार

ठाण्यातून गद्दारीला सुरुवात झालीये. एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांची गद्दारी जनतेला आवडेली नाही. त्यामुळे जनता त्यांच्याकडे पाठ फिरवतेय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती. यास उत्तर देताना म्हस्के म्हणाले, कोण दानवे? त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना स्वतःची योग्यता तपासून घ्यावी. ते आमदार शिंदे साहेबांमुळे झाले. ठाण्यात येऊन त्यांनी टीवटीव करु नये. अन्यथा ठाण्यातील शिवसैनिक भडकला तर तुमचे काही खरे नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे.

पवार कुटुंबीयांचे नुकसान

राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या टीकांवर ते म्हणाले, सुप्रियाताई मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी जर आमच्यावर टीका केली नाही तर त्यांचा पक्ष कसा चालेल. त्यांच्या पक्षात जी काही उरलेली लोक आहेत त्यांना विरोध दाखवायचा आहे. युतीच्या या आलेल्या सरकारमुळे सगळ्यात जास्त जर कोणाचं नुकसान झाले असेल तर ते पवार कुटुंबीयांचे झाले आहे. राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून टीका होत आहे.

दसरा मेळावा आमचाच

जे बाळासाहेबांचे विचार आहेत तसे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांचा म्हणजे शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार असेही म्हस्के म्हणाले. आणि हा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या घरची भेट ही केवळ गणपतीच्या दर्शनासाठी घेतलेली भेट असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...