आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारामुळे रुग्णालयात दाखल:माजी मंत्री अनिल देशमुख जेजे रुग्णालयात दाखल, अस्थिरोग विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी जेजे हॉस्पिटलमधील अस्थिरोग विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यांना काेणत्या आजारामुळे दाखल करण्यात आले याबाबत माहिती देण्यात आली नाही.

पोलिस अधिकाऱ्यांनुसार, ७१ वर्षीय देशमुख यांना शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

गेल्या आठवड्यात भ्रष्टाचाराच्या स्वतंत्र प्रकरणात न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांची कोठडी घेण्यास परवानगी दिली हाेती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानुसार, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महिन्याकाठी रेस्तराँ, बारकडून १०० कोटी रु. वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी गेल्या एप्रिल महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा सहकारी मुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या सीबीआय कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...