आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मढ स्टुडिओच्या तपासाचा ईडीने मागितला अहवाल:माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कथित मढ स्टुडिओ (चित्रीकरणासाठी) घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे. अस्लम शेख यांनी मढ मार्वेत एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केले होते.

याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांनी मढ, एरंगल आणि भाटी गावातल्या ४९ स्टुडिओंसंदर्भात चौकशी समिती स्थापन केली होती. याच चौकशी समितीचा अहवाल आता ईडीने मागवला आहे. मनी लाँड्रिंग आणि फेमा कायद्यानुसार हा अहवाल तपासणार असल्याचे ईडीने म्हटले आहे. अस्मम शेख हे काँग्रेसचे स्थानिक मालाड-मालवणीचे आमदार असून महाविकास आघाडीच्या काळात ते मत्स उत्पादन विकास मंत्री होते. तसेच मुंबई शहरचे पालकमंत्री होते. दोन वर्षात माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात २८ फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम केले. यातील ५ स्टुडिओ सीआरझेड झोनमध्ये आहेत. मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. शेख यांनी ३०० कोटींचा घोटळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला.

नेमके प्रकरण काय? मुंबईत मालाड पश्चिममध्ये मढ, एरंगलमध्ये व्यावसायिक स्टुडिओचं बांधकाम समुद्रात नियमांना धाब्यावर बसवत स्टुडिओचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. पाच स्टुडिओ सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्य यांनी आरोप केला आहे. अस्लम शेख यांनी स्टुडिओच्या बांधकामास मदत केल्याचाही सोमय्यांचा आरोप. सोमय्यांच्या तक्रारीनंतर पर्यावरण विभागाकडून अस्लम शेख यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...