आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर:माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंना 'मानाचे पान' देत राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, राज्यातील 'या' आठ नेत्यांची नावे

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडे आणि विनोद तावडे पक्षावर नाराज असल्याच्या होत्या चर्चा

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. माजी मंजत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मानाच पानं देत या कार्यकारिणीत सचिव म्हणून स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातून किती जणांची नावे?
पंकजा मुंडे ( महामंत्री)
विनोद तावडे ( महामंत्री)
विजया राहटकर ( महामंत्री)
सुनिल देवधर ( महामंत्री)
व्ही. सतीश (सहसंघटन मंत्री)
जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
संजू वर्मा (प्रवक्ते)
हिना गावित (प्रवक्त्या)

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे होते नाराज
राज्यातील भाजपमधील अनेक महत्त्वाचे नेते पक्षावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आलेले नव्हती. तसेच पंकजा मुंडे यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर दोघांच्या खांद्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती. यामुळे हे दोघंही पक्षावर नाराज असल्याचे चित्र होते. यानंतर चंद्रकांत पाटलांनी एकदा बोलताना पंकजा मुंडेना केंद्रात जागा देण्यात येईल असे म्हटले होते. यानंतर आज जाहीर झालेल्या कार्यकरीनीत या दोघांना मानाचे पान देत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...