आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार राम पंडागळेंचा शिंदे गटात प्रवेश:मराठा कार्यकर्त्यांनी घेतला मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणाचा निर्णय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार राम पंडागळेंनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदेंची कामाची पद्धत आवडल्याने हजारो दलित बांधवासह एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झालो असे पंडागळेंनी सांगितले आहे.

राम पंडागळे कोण आहेत?

राम पंडागळे हे सुरूवातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले, यानंतर शिवसेनेना जय महाराष्ट्र करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर आता काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्य करण्याची पद्धत आवडल्याचे सांगतानाच आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी, काल राज्यभर पसरल्यानंतर आता राज्यभरातील मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन संरक्षण देण्यासाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यावर त्यांच्या संरक्षणासाठी राज्यभरातील मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ बैठका घेतल्या आणि मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटून संरक्षण देण्याचा निर्णय मराठा कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यामुळे आज वर्षा बंगल्यावर मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला न्याय देणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना अखेरच्या श्वासापर्यंत संरक्षण देऊ अशी भावना यावेळी या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...